‘प्रहार’च्या वतीने कळंबमध्ये ताली-थाली बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:05+5:302021-05-22T04:30:05+5:30
याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने तूर मूग व उडीद यांची आयात आता पूर्णपणे खुली ...
याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने तूर मूग व उडीद यांची आयात आता पूर्णपणे खुली केली आहे. याची अधिसूचना १५ मे २०२१ ला काढली आहे. मागील तीन वर्षांपासून कडधान्य हे प्रतिबंधीत वर्गवारीत होते. ते आता खुल्या वर्गवारीत आल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार असून तूर, मूग, उडीदसह इतर कडधान्यांचे भाव जे वाढणार होते ते आता वाढणार नाहीत. उलट हमीभावाच्या खाली हा भाव येऊ शकतो. हा भाव नियंत्रित ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्यासाठी ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी निवेदनात केली असल्याचे प्रहारचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितले.
कॅप्शन -
कडधान्य आयात विरोधात कळंब तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने ताली-थाली बजाव आंदोलन केले. कळंब येथे प्रहारचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.