‘सीओं’नी घेतला आरोग्य केंद्रातील कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:13+5:302021-03-14T04:28:13+5:30
अणदूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे प्राथमिक आरोग्य ...
अणदूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. तसेच जिल्हा परिषद कन्या शाळेस भेट देऊन शाळेच्या दैनंदिन कामाची पाहणी केली.
६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्षाआतील रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांना कोविडचे लसीकरण करणे बंधनकारक आहे. ज्या नागरिकांना कोविडची लक्षणे दिसून येतील, त्यांना तत्काळ तपासणी करून त्यावर उपचार करण्यासाठी प्रवृत्त करणे व समाजात त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, अशा सूचना डॉ. फड यांनी यावेळी केली. यावेळी जि. प. कन्या शाळेत विद्यार्थ्यांनी फुलवलेली बाग, सुशोभीकरणाची पाहणी करून मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. प्रशांत मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकांक्षा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, धनराज मुळे, ग्रामविकास अधिकारी देवीदास चव्हाण, मुख्याध्यापक यशवंत मोकाशे, आरोग्य सहायक धोंडीबा कदम यांच्यासह आरोग्य कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी अणदूर येथे भेट दिली. यावेळी सरपंच रामचंद्र आलुरे, डाॅ. अविनाश गायकवाड, डाॅ. नागनाथ कुंभार, धनराज मुळे, यशवंत मोकाशे आदी.