‘कॅच द रेन’ अंतर्गत १२ गावांत झाल्या स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:31 AM2021-03-21T04:31:05+5:302021-03-21T04:31:05+5:30
‘कॅच द रेन’ कार्यक्रमांतर्गत ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या विषयावर तालुक्यातील कलदेव निंबाळा, आलूर, समुद्राळ कडदोरा, व्हतांळ, एकुरगा ...
‘कॅच द रेन’ कार्यक्रमांतर्गत ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या विषयावर तालुक्यातील कलदेव निंबाळा, आलूर, समुद्राळ कडदोरा, व्हतांळ, एकुरगा जवळगा बेट, एकुरगावाडी कुन्हाळी बोरी माडज, चिंचोली भुयार या बारा गावांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये महिला व किशोरी मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या हाेत्या. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. तसेच महिलांसाठी दहा गावांत भाषण स्पर्धा झाली. याही स्पर्धेतून पहिले तीन स्पर्धक निवडण्यात आले. यानंतर प्रत्येक गावातून जनजागृतीच्या अनुषंगाने रॅलीही काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर औरादे, पल्लवी डोनगावे, सुवर्णा कोटे, सरोजा औरादे, मालाश्री बगले, ज्योती बोळदे, अलका गुरव,सुवर्णा जाधव, सिंधू नागदे, वैशाली चव्हाण, जयश्री सगर, संगीता करके, महादेवी करके, प्रतिभा शिंदे, अश्विनी इंगळे, मुस्कान शेख, रुक्मिणी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.