काक्रंब्यात सव्वाशेवर तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:54+5:302020-12-25T04:25:54+5:30
(फोटो - रणजित मोरे २४) काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे २३ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत ...
(फोटो - रणजित मोरे २४)
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे २३ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी सव्वाशेहून अधिक तक्रारी लेखी स्वरूपात दाखल केल्या. यात रस्ता, अतिक्रमणांबाबत तक्रारींचा अधिक समावेश होता.
ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात. परंतु, तक्रार कोठे करावयाची याबाबत फारशी माहिती नसते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संकल्पनेतून येथे महाराजस्व अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांकडून त्यांच्या अडचणी लिखीत स्वरूपात घेण्यात आल्या. यात पाणी पुरवठा, शौचालय, घरकूल, रस्ता, नाली, विविध बँकांची कर्जमाफी, रेशन कार्ड नसणे, माल वेळेवर मिळत नसेल, बळीराजा चेतना अभियान, शेतरस्ता, रोजगार हमी, पोकरा, राष्ट्रीय महामार्ग, वीजपुरवठा, ७-१२़, ८ अ मधील दुरूस्ती आदी प्रकारच्या जवळपास १३० तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी शेतरस्ता, शिवरस्ता, गावातील अतिक्रमण, महामार्गावरील अतिक्रमण याविषयी होत्या.
यावेळी तलाठी बाळासाहेब पवार, ग्रामसेवक चैतन्य गोरे, ग्रा. पं. सदस्य अनिल बंडगर, कृषी सहाय्यक श्लोक अंधारे, रोजगार सेवक विनोद साबळे, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी सुरवसे, समाधान पाटील, बालाजी साबळे, राजेंद्र मोहिते, बाळू वाघमारे, चेतन बंडगर, अहमद अन्सारी आदी उपस्थित होते.