चार महिन्यांत वाचनालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:36+5:302021-07-23T04:20:36+5:30

बसवराज पाटील -मरूम येथे पार पडला कार्यक्रम मुरूम : दलित वस्ती सुधार योजनेतून नव्याने उभारण्यात येणाऱ्या शहरातील भीमनगर येथील ...

Complete the library building work in four months | चार महिन्यांत वाचनालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करा

चार महिन्यांत वाचनालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करा

googlenewsNext

बसवराज पाटील -मरूम येथे पार पडला कार्यक्रम

मुरूम : दलित वस्ती सुधार योजनेतून नव्याने उभारण्यात येणाऱ्या शहरातील भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयाच्या नवीन इमारतीचे काम पालिकेने चार महिन्यांत पूर्ण करावे. या माध्यमातून शहरातील वाचकांसाठी सुसज्ज असे वाचनालय उपलब्ध हाेईल, असे मत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.

मुरूम शहरातील डाॅ. आंबेडकर वाचनालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शहरातील भीमनगर येथे १९५५ या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची इमारत उभी होती. ही इमारत जुनी झाल्याने पालिकेने ती पाडून या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेतून जवळपास ७२ लाख रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. बसवराज पाटील यांच्या हस्ते या नवीन इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिता अंबर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, नगरसेवक रशीद शेख, विजयालक्ष्मी भालेराव, श्रीकांत बेंडकाळे, आयुब मासुलदार, प्रमोद कुलकर्णी, योगेश राठोड आदी उपस्थित हाेते.

तत्पूर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राम कांबळे यांनी धम्म वंदना म्हणून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी भारतीय संविधान ग्रंथ देऊन बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी झुंबर बनसोडे, महेंद्र गायकवाड, रूपचंद गायकवाड, महेंद्र कांबळे, बलभीम कांबळे, राहुल कांबळे, विजय कांबळे, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत गोडबोले, भगवान कांबळे, राजेश गायकवाड, महेश लिमये, अजिंक्य कांबळे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, सिद्धांत गायकवाड, प्रणित गायकवाड, प्रशांत मुरूमकर, समर्थ गोडबोले, आबाराव कांबळे, प्रा.महेश कांबळे, सिद्धांत सोनवणे, प्रणाली कांबळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अण्णाराव कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांनी मानले.

फोटो ओळी......

मुरूम येथील भीमनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयाच्या भूमिपूजनप्रसंगी बसवराज पाटील. समवेत बापूराव पाटील, शरण पाटील, अनिता अंबर, सचिन पाटील, दिलीप भालेराव आदी.

Web Title: Complete the library building work in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.