डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच, २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळविले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:57+5:302021-05-30T04:25:57+5:30
उस्मानाबाद -डिसेंबर २०२१ अखेर संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, जिल्ह्यातील लसीकरणाची सध्याची गती ...
उस्मानाबाद -डिसेंबर २०२१ अखेर संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, जिल्ह्यातील लसीकरणाची सध्याची गती पाहता संपूर्ण लसीकरण अवघडच दिसते. कारण १६ जानेवारी राेजी काेराेना लसीकरणास सुरुवात झाली. जवळपास साडेतीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार ५०७ लाेकांनाच लस टाेचून झाली आहे. ही गती अशीच राहिल्यास १८ ते ६० वर्षावरील १२ लाख ५९ हजार २५७ लाेकांना लस देण्यासाठी १६ सप्टेंबर २०२२ उजाडू शकते.
काेराेनाची पहिली लाट ओसरताच दुसऱ्या लाटेने धडक दिली. ही लाट तीव्र स्वरूपाची असल्याने रूग्णसंख्या व मृत्यूदरही झपाट्याने वाढत गेला. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात आला. १६ जानेवारी २०२१ राेजी जिल्ह्यात लसीकरणास सुरूवात झाली. जानेवारीअखेर म्हणजेच १४ दिवसांत ४ हजार ८४ लाेकांना लस देण्यात आली. दिवसाकाठी हे प्रमाण २९० ते २०९१ एवढे हाेते. फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण आणखी वाढले. महिनाभरात १ हजार ६३० लाेकांना लस टाेचली. प्रतिदिन लसीकरणाचे प्रमाण ३५४ एवढे हाेते. मार्च महिन्यात काेराेनाग्रस्तांची संख्या वाढत गेली तसे लसीकरणही वाढले. महिनाभरात ४५ हजार ३०४ लाेक लसवंत झाले. प्रत्येक आठवड्यात किमान १० हजार २०० वर लाेकांना लस दिली गेली. एप्रिल महिन्यात हे प्रमाण आणखी वाढले. सुमारे ९६ हजार ६५७ लाेकांना लस देण्यात आली. प्रतिदिन सरासरी १ हजार ४६१ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. मे महिना सरण्यास आणखी दाेन दिवसाचा कालवधी उरला आहे. असे असले तरी २८ मे पर्यंत ९१ हजार ८६८ लाेकांना लस दिली आहे. प्रतिदिन हे प्रमाण ३ हजार २८१ एवढे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. लसीचा पुरवठा असाच सुरू राहिल्यास १२ लाख ५९ हजार २५७ लाेकांचे लसीकरण पूर्ण हाेण्यास डिसेेंबर २०२१ अखेर नव्हे तर १६ सप्टेंबर २०२२ ची वाट पहावी लागेल, हे विशेष.
चाैकट...
१८ पेक्षा कमी वयाेगटासाठीचे काय?
अठरा ते साठ व त्यावरील वयाेगटातील लाेकसंख्या सुमारे १२ लाख ५९ हजार २५७ एवढी आहे. सध्याची गती कायम राहिल्यास यांचे लसीकरण पूर्ण हाेण्यास किमान १६ सप्टेंबर २०२२ उजाडेल. दरम्यान, शासनाने अठरापेक्षा कमी वयाेगटासाठी अद्याप लस जाहीर झालेली नाही. ही संख्याही सुमारे २७ ते २८ टक्के आहे. या वयाेगटाचे लसीकरण सुरू झाल्यास यासाइी दीड ते दाेन महिन्यांचा कालावधी लागू शकताे.
शासनाने अठरा ते ४४ या वयाेगटाचे लसीकरण सुरू केले हाेते. परंतु, लसीचा तुटवडा असल्याने पुन्हा ब्रेक लागला. या वयाेगटातील लाभार्थीसंख्या ७ लाख ३४ हजार ५६६ एवढी आहे. आजवर अवघ्या ११ हजार ९५० जणांनाच लस टाेचली आहे. हे प्रमाण १.६२ टक्के एवढे आहे.
पहिला डाेस सुमारे अडीच लाखांच्या आसपास लाेकांना देण्यात आला आहे. तर दुसरा डाेस ४२ हजार २१४ जणांना दिला आहे. याचे प्रमाण ३.३९ टक्के एवढे आहे. यात आराेग्य कर्मचाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक ६२.८३ टक्के एवढे आहे.
चाैकट...
आधी ५ केंद्र, आता तब्बल २४९
जिल्ह्यात १६ जानेवारी राेजी लसीकरण सुरू झाल्यानंतर केवळ पाचच सेंटर सुरू करण्यात आली हाेती. कालांतराने त्यात वाढ हाेत गेली. आजघडीला जिल्हाभरातील ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा, आयुर्वेदिक रूग्णालय, प्राथिम आराेग्य केंद्र, उपकेंद्रातील मिळून लसीकरण केंद्रांची संख्या सुमारे २४१ वर जावून ठेपली आहे. तसेच खाजगी आठ केंद्रांचा समावेश आहे. म्हणजेच जिल्हाभरातील केंद्रांची संख्या सुमारे २४९ एवढी झाली आहे. या केंद्राद्वारे पंधरा दिवसांत २ लाख लाेकांचे लसीकरण केले जाऊ शकते. परंतु, तेवढी लस उपलब्ध हाेत नाही, हे विशेष.
काेट...
जिल्ह्यात आजघडीला शासकीय व खाजगी मिळून सुमारे २४९ लसीकरण केंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आजवर सुमारे अडीच लाख लाेकांचे सीकरण पूर्ण करण्यात आले आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्रांची संख्या निश्चित केली जाते. मागणीनुसार लस उपलब्ध झाल्यास लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढेल.
-कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी.