भक्तिमय वातावरणात याज्ञवल्क्य धार्मिक उत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:47+5:302021-07-24T04:19:47+5:30
तुळजापूर-श्री तुळजाभवानी मंदिरात भवानी शंकर मंडपातील याज्ञवल्क्य धार्मिक उत्सव सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी दुपारी झाली. ...
तुळजापूर-श्री तुळजाभवानी मंदिरात भवानी शंकर मंडपातील याज्ञवल्क्य धार्मिक उत्सव सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी दुपारी झाली.
सप्ताहचे अध्यक्ष याज्ञवल्क्य मंडळाचे अध्यक्ष ॲड. शैलेश पाठक यांनी विधीवत प्रतिमापूजन केले. यानंतर मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. हा सप्ताह कोरोना महामारी कमी होण्यासाठी, तसेच विश्वजन कल्याणार्थ संपन्नेतेसाठी केला गेला. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, उपाध्ये गजानन लसणे, दीपक लसणे, प्रसाद प्रयाग, विजय कुमार पाठक, किरण पाठक, गणेशा अंबुलगे, प्रतीक प्रयाग, श्रीकृष्णा अंबुलगे, भय्या दीक्षित, मंदिरचे सरकारी उपाध्ये बंडोपंत पाठक, बधीर संस्थाचे कर्मचारी, तसेच याज्ञवल्क्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. हा धार्मिक उत्सव आषाढी नवमी ते आषाढी पाैर्णिमा या कालावधीत प्रतिवर्षी साजरा केला जातो.