परंड्यात काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:54+5:302021-07-15T04:22:54+5:30
(फोटो : विजय माने) परंडा : केंद्र सरकार सातत्याने करत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परंडा येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने ...
(फोटो : विजय माने)
परंडा : केंद्र सरकार सातत्याने करत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परंडा येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी शहरात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सायकल रॅलीला सुरुवात झाली. शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, बावची चौकमार्गे ही रॅली जुनी बाजारपेठ, मंडई पेठ, आठवडा बाजार, टिपू सुलतान चौक, पोलीस स्टेशनमार्गे बार्शी-परंडा राज्यमार्गावरील तिरुमला पेट्रोल पंपावर दाखल झाली. या ठिकाणी इंधन दरवाढीविरोधात केंद्र शासनाच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व ॲड. नुरुद्दीन चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरसाडे यांनी केले. आंदोलनात काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष ॲड. अजय खरसडे, काँग्रेस शहराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, नितीन गाढवे, कालिदास खैरे, दत्ता खैरे, शिवाजी नाईकनवरे, ॲड. धनंजय झाडबुके, महावीर इतापे, सदानंद बोंबलट, सुनील शिंदे, रवींद्र सोनवणे, समाधान लोंढे, शशिकांत खैरे, जयसिंग बिडवे, राजेंद्र परबत, बाळासाहेब जाधव, खंडू चाबुकस्वार, महादेव ठवरे, काशिनाथ लोकरे, बापू घोंगडे, बाबा पठाण, तुकाराम ढोरे, आप्पा तरस, विठ्ठल काकडे, हनुमंत सोनवणे, संतोष जगताप आदी सहभागी झाले होते.