ओबीसी राजकीय आरक्षणासाठी काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:29+5:302021-06-27T04:21:29+5:30

उस्मानाबाद : ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील रद्द करण्यात आलेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ...

Congress holds for OBC political reservation | ओबीसी राजकीय आरक्षणासाठी काँग्रेसचे धरणे

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी काँग्रेसचे धरणे

googlenewsNext

उस्मानाबाद : ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील रद्द करण्यात आलेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारने २०१८ मध्ये १०२ वी घटनादुरुस्ती केली. या घटनादुरुस्तीनुसार सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढील निवडणुकींत ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, नगर परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना लढविता येणार नाहीत. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील आरक्षणासाठी विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणासाठी आता काँग्रेस पक्षही मैदानात उतरला असून, शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील म्हणाले, ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण काँग्रेस सरकारने १९९४ साली दिले होते, हे आरक्षण ओबीसी बांधवांच्या हक्काचे आहे. हे आरक्षण पुन्हा लागू होण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा उपलब्ध केल्यास मोठी अडचण दूर होऊन ओबीसींना न्याय मिळू शकतो. काँग्रेस पक्ष यासाठी पाठपुरावा करीत राहील, असेही धीरज पाटील म्हणाले. आंदोलनकर्त्यांनी ओबीसीचे राजकीय आरक्षण संपविणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण रद्द करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, युवकचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, अभिषेक बागल, ओबीसी विभागाचे धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, प्रसन्न कथले, असंघटित कामगार अध्यक्ष देवानंद येडके, सुरेंद्र पाटील, सलमान शेख, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, विधि विभागाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित शिंदे, अतुल देशमुख, प्रणित डिकले, गणपती कांबळे, अभिजित देडे, प्रवक्ता कृष्णा तवले, समाधान घाटशिळे, नियामत मोमीन, इम्रान हुसैनी, विद्यार्थी काँग्रेसचे सौरभ गायकवाड, सचिन धाकतोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Congress holds for OBC political reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.