बांधकाम विभागाने केली घनदाट वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:21 AM2021-07-03T04:21:05+5:302021-07-03T04:21:05+5:30
तुळजापूर : वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथील नागोबा मंदिर परिसरात ३ ...
तुळजापूर : वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथील नागोबा मंदिर परिसरात ३ हजार विविध जातीचे वृक्ष घनदाट पद्धतीने लागवड करण्यात आले. यासाठी ३५ बाय २० मीटरचा फ्लॉट तयार करून एक बाय एक मीटरचे चौकोन तयार करून त्यात बांबू, लिंब, चिंच, वड, सीताफळ, पेरू, करंज या जातीचे वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी जि. प. बांधकाम कार्यकारी अभियंता नितीन भोसले, उपअभियंता व्ही. जी. चिटगोपकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. एन. गपाट, शाखा अभियंता रविकिरण मोहिते, सारोळा सरपंच मुकुंद पवार, सांगवी मार्डी सरपंच जयंतराव बागल, जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक, बांधकाम विभाग कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
010721\2558img-20210630-wa0021.jpg
वृक्ष लागवड करताना जि प बांधकाम कार्यकारी अभियंता नितीन भोसले,उपअभियंता व्ही जी चिटगोपकर,शाखा अभियंता रवीकिरण मोहिते सह आदी उपस्थित होते.