चेकपोस्टमध्येच कंटेनर घुसला, भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 10:37 IST2019-10-10T10:36:37+5:302019-10-10T10:37:36+5:30
पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी व होमगार्ड संतोष जोशी हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.

चेकपोस्टमध्येच कंटेनर घुसला, भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
उस्मानाबाद - जिल्ह्यातील सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर येडशी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यासह एका होमगार्डचाही जागीच मृत्यू झाला आहे. येडशीजवळ चेकपोस्टमध्ये कंटेनर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. तुळजापूरला जाणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांना वळवण्यासाठी नाकाबंदी लावण्यात आली होती. मध्यरात्री 3.00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी व होमगार्ड संतोष जोशी हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. नवरात्रोत्सव संपल्यामुळे भाविक पुन्हा आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे तुळजापूरच्या दिशेने येणारी-जाणारी वाहतूक वळवण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यासाठी त्यांनी चेकपोस्ट उभे केले होते. मात्र, मध्यरात्री 3.30 च्या सुमारास अर्ध्या झोपेत असलेल्या पोलिसांच्या अंगावरुन कंटेनर गेला. त्यामध्ये दोन सुरक्षा रक्षकांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी सिग्नल, लाईट सुरू न ठेवल्यानं कंटेनर चालकाला नाकाबंदी असल्याचं समजून आलं नाही. त्यामुळे, भरधाव कंटेनर थेट नाकाबंदीच्या चेकपोस्टमध्ये घुसल्याने ही दुर्दैवी घटना घडली.