माणकेश्वरमधील कोरोना आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:32 AM2021-05-23T04:32:08+5:302021-05-23T04:32:08+5:30

माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वरमध्ये एप्रिल आणि मेच्या पंधरवड्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काळजी वाढवणारी होती. अशातच बधितांमध्ये अनेकांना प्राणही ...

In Corona Atoka in Mankeshwar | माणकेश्वरमधील कोरोना आटोक्यात

माणकेश्वरमधील कोरोना आटोक्यात

googlenewsNext

माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वरमध्ये एप्रिल आणि मेच्या पंधरवड्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काळजी वाढवणारी होती. अशातच बधितांमध्ये अनेकांना प्राणही गमवावा लागला; परंतु सध्या स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

मागील २० दिवसांच्या कालावधीमध्ये गावात दररोज दहा ते पंधराच्या सरासरीने कोरोनाबाधितांची भर पडत होती. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून ही संख्या कमी होताना दिसत आहे. २० मार्च ते १५ मेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहितीनुसार गावात कोरोनाचे २४० रुग्ण आढळून आले होते. दररोज वाढणारी रुग्णसंख्या यामुळे ग्रामस्थ, आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनही चिंतेत होते. रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. ऑक्सिजनसाठी दमछाक होत होती. त्यामुळे तालुका प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय ठरला होता. त्यामुळे तालुका प्रशासनाने कडक निर्बंध घालून गावामध्ये सक्तीची १४ दिवस संचारबंदी घोषित केली होती. परिणामी कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत झाली आहे.

सुरुवातीला २७ टक्क्यांवर असलेला रुग्णाचा पॉझिटिव्हिटी रेट आता २.५० टक्क्यांवर आला आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही आटोक्यात आला आहे.

कोट..........

माणकेश्वर येथे लसीकरणासही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आतापर्यंत ४५ वर्षांवरील १ हजार ५८० नागरिकांना तर उपकेंद्रांतर्गत एकूण ६०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. येथील पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. मागील आठ दिवसांमध्ये केवळ ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या केवळ १० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

- अंजुश्री भोसले, वैद्यकीय अधिकारी

Web Title: In Corona Atoka in Mankeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.