कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक, घराघरात वाढली चारचाकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:35+5:302021-07-23T04:20:35+5:30
उस्मानाबाद : कोरोना काळात गतवर्षी दोन महिने व यावर्षी दीड महिने सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर शासनाने ...
उस्मानाबाद : कोरोना काळात गतवर्षी दोन महिने व यावर्षी दीड महिने सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत वाहतूक सेवा सुरू झाली आहे. मात्र, अनेक नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त ये-जा करण्याकरिता तसेच सहकुटुंब बाहेर गावी जाता यावे, यासाठी अनेक नागरिकांनी चारचाकी वाहने खरेदी करण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० व २०२१ मध्ये चारचाकी वाहनांची खरेदीचे प्रमाण वाढले आहे.
दुचाकी-चारचाकी विक्री वाढली
वर्ष दुचाकी चारचाकी ॲटो कार
२०१९ १९०३२ १४१२ ४३५ ३८
२०२० १८५९८ १५६१ २१५ ५२
२०२१ १४०१९ १३९४ ३२ ०५
ऑटोचालक-कारमालक परेशान
गतवर्षी कोरोना काळात दोन एक ते दीड महिने ॲटोरिक्षा बंद होत्या. त्यानंतर रिक्षावाहतूक सुरळित झाली. मात्र अनेकांकडे दुचाकी चारचाकी वाहने झाली आहेत. त्यामुळे रिक्षाला पॅसेजर कमी मिळत आहेत.
अमन शिंदे, ॲटोरिक्षा चालक
दोन वर्षापूर्वी कार घेतली आहे. लग्नसराईच्या दिवसात तसेच अन्य वेळेस गाडीला भाडे मिळत होते. कोरोना संसर्गामुळे भाडे मिळत नाही. आता घरोघरी वाहने झाली आहेत. त्यामुळे वाहन घरासमोर उभी करण्याची वेळ आली आहे.
मच्छिंद्र क्षीसरसागर, कारमालक
म्हणून घेतली चारचाकी...
कोरोना काळात सतत बससेवा बंद राहत होती. शिवाय, खासगी वाहनेही वेळेवर मिळत नव्हते. त्याचे भाडेही न परवडणारे होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी स्वत:ची चारचाकी गाडी घेतली आहे.
डॉ. अनिस शेख