कोरोनाची साथ कमी झाली, त्याचबरोबर डेंग्यू, मलेरिया घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:28+5:302021-06-09T04:40:28+5:30

अशी घ्या काळजी घरातील पाण्याची भांडी काेरडी करण्यावर भर द्यावा, पाण्याची भांडी व टाकी न विसरता झाकून ठेवावी. घरातील ...

Corona outbreaks decreased, as did dengue and malaria | कोरोनाची साथ कमी झाली, त्याचबरोबर डेंग्यू, मलेरिया घटला

कोरोनाची साथ कमी झाली, त्याचबरोबर डेंग्यू, मलेरिया घटला

googlenewsNext

अशी घ्या काळजी

घरातील पाण्याची भांडी काेरडी करण्यावर भर द्यावा, पाण्याची भांडी व टाकी न विसरता झाकून ठेवावी. घरातील कुलर रिकामे करून कोरडे करावे.

संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत.

थाेडीबहुत लक्षणे आढळून आली तरी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरू करावेत.

अशी आहे आकडेवारी

डेंग्यू मलेरिया चिकुनगुण्या

२०१७ २२० ३२६६६६ २२०

२ २ २

२०१८ २५२ ३०३५४२ २५२

१७ ६ १७

२०१९ ३८३ ३३४५१५ ३८३

४८ २ ४८

२०२० १८५ २२८४९० १८५

१८ १ १६

२०२१ मे ६३ ६४२९५ ६३

२ ० १

डबक्यामध्ये गप्पी मासे

१ दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती केली जात असते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील गप्पी मासे पैदास केंद्रातील मासे ज्या ठिकाणी उद्रेक झाला आहे, त्या ठिकाणच्या डबक्यात सोडली जात असतात.

ज्या गावात डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. अशा गावात हिवताप विभागाचे कर्मचारी जाऊन ॲबेटिंग, तसेच धूर फवारणी करण्यावर भर देतात. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.

कोट...

खबरदारी घ्या

मागील पाच महिन्यांत केवळ दोन डेंग्यू व एक चिकुनगुण्याचा रुग्ण आढळून आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. डोसोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळणे, शिवाय परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचा आहे.

डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी,

Web Title: Corona outbreaks decreased, as did dengue and malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.