कोरोना वॉरियर्सचा मोहा येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:34 AM2021-07-27T04:34:00+5:302021-07-27T04:34:00+5:30

कळंब : तालुक्यातील मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवा कर्मचारी व आशाताई यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोरोना ...

Corona Warriors felicitated at Moha | कोरोना वॉरियर्सचा मोहा येथे सत्कार

कोरोना वॉरियर्सचा मोहा येथे सत्कार

googlenewsNext

कळंब : तालुक्यातील मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवा कर्मचारी व आशाताई यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन व मोहेकर ॲग्रोचे मुख्य प्रवर्तक हनुमंत मडके, अखिल भारतीय वारकरी महामंडळ उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब यादव, स्फूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे-पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधवर, बालाजी मडके, संताजी वीर, विजयानंद मडके, सतीश वैद्य, सावता माळी, बलराम कुलकर्णी, नितीन बंडगर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आशाताई उपस्थित होते. सूत्रसंचलन विक्रम वीर यांनी तर आभार बालाजी मडके यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन स्वा. सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील व वंजारी सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधवर यांनी केले होते.

260721\152-img-20210726-wa0040.jpg

कळंब तालुक्यातील मोहा येथे कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेले आरोग्य कर्मचारी व आशाताईचा सत्कार करण्यात आला. यावेळी हनुमंत मडके,नानासाहेब यादव, डॉ राहूल जाधवर, शिवाजी गिड्डे पाटील, मकरंद पाटील आदी उपस्थित होते

Web Title: Corona Warriors felicitated at Moha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.