रूई ग्रामस्थांनी केले कोरोनाला हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:55+5:302021-06-02T04:24:55+5:30

परंड्यापासून दोन किमी अंतरावर हे गाव असल्यामुळे या गावाचा परंड्याशी रोजचा संपर्क. तरीही ग्राम दक्षता समितीच्या सतर्कतेमुळे आणि गावातील ...

Corona was deported by Rui villagers | रूई ग्रामस्थांनी केले कोरोनाला हद्दपार

रूई ग्रामस्थांनी केले कोरोनाला हद्दपार

googlenewsNext

परंड्यापासून दोन किमी अंतरावर हे गाव असल्यामुळे या गावाचा परंड्याशी रोजचा संपर्क. तरीही ग्राम दक्षता समितीच्या सतर्कतेमुळे आणि गावातील नागरिकांच्या सहकार्यामुळे गावात मागील १५ ते २० दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.

गावात यापूर्वीच कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी असून, जनजागृती, गावकऱ्यांशी संवाद, सर्व कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण, औषधे वाटप, यामुळे गाव सध्या कोरोनामुक्त आहे.

रुई गावच्या सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील या तिन्ही मुख्य जबाबदारीच्या पदांवर महिला विराजमान आहेत.

गाव कोरोनामुक्त होण्यासाठी सरपंच कुसुम जगताप, उपसरपंच मीरा लिमकर, तलाठी विशाल खळदकर, ग्रामसेवक बी.एस, राठोड, शिक्षक राऊत, आशा सेविका ललिता लिमकर, पोलीस पाटील प्रतिभा लिमकर, अंगणवाडी सेविका वैशाली लिमकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Corona was deported by Rui villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.