coronavirus : उस्मानाबादेत १३ बाधितांची भर ; एकूण रुग्णसंख्या ४१८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:11 PM2020-07-14T17:11:08+5:302020-07-14T17:12:15+5:30
९८ पैक्की ६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह
उस्मानाबाद : जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. १४ जुलै रोजी पहाटे ९८ व्यक्तींच्या स्वॅबचा रिपोर्ट आला असता, १३ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ४१८ वर जाऊन ठेपली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपायोजना केल्या जात असल्या तरी बाधितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास लातूर येथील प्रयोगशाळेने जिल्हा रुग्णालयाला ९८ स्वॅबचा अहवाल सादर केला. त्यानुसार १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर ६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ३ स्वॅब रिजेक्ट झाले असून १६ अनिर्णित ठेवले आहेत. त्यामुळे आता बाधितांची संख्या ४१८ वर पोहोचली. यापैकी २५० जण उपचारानंतर घरी परतली आहेत. सध्या १५१ जणांवर उपचार सुरू आहेत.