Coronavirus : उस्मानाबादेत आणखी १२ कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:13 PM2020-07-19T12:13:37+5:302020-07-19T12:14:04+5:30
१५० पैकी १३८ अहवाल निगेटिव्ह
उस्मानाबाद - दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. शनिवारी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत १५० नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी साडेदहा वाजता आला असता नव्याने १२ बाधितांची भर पडली. तर १३८ रिपोर्ट निगेटिव्ह आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. शनिवारी १५० व्यक्तींचे नमुने घेऊन अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या सर्व नमुन्यांचा अहवाल रविवारी सकाळी १०.३० वाजता आला. त्यानुसार बाधितांची संख्या १२ ने वाढली. तर १३८ रिपोर्ट निगेटिव्ह आले.
यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ०९, उमरगा ०१ तर तुळजापूर तालुक्यातील ०२ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात रुग्णसंख्येने पाचशेच्या टप्पा ओलांडला आहे. तर २४ जणांचा मृत्यू झाला.