coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:17 PM2020-03-25T12:17:35+5:302020-03-25T12:17:57+5:30

शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. 

coronavirus: Gudhipadwa not celebrated in Shanbho Mahadev Mandir of Lohara | coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित

coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित

googlenewsNext
ठळक मुद्देगावात उभारली जातेय एकच गुढी

- बालाजी बिराजदार 
लोहारा (जि.उस्मानाबाद) : शेकडो वर्षापासून तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदीरात उभारली जाते. शंभु महादेवाची अर्धागिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काटीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. पण या परंपरेला प्रथम कोरोनामुळे खंड पडला आहे. त्यात शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. 
           

तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव गावात दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी गावात कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. गावची गुढी एकच ती म्हणजे शंभो महादेवाची काठी उभारली जाते. ही काठी सायंकाळी सहाच्या सुमारास उभारण्यात येते. व या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी  शकडो भक्तमंडळी या महादेवाच्या काठीबरोबर पायी चालच ही शंभो महादेवाची काठी घेवून शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर २५० किमीचे आहे. दररोज ४० किमीचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा, उस्मनाबाद, सोलापुर, पुणे,सातारा जिल्ह्यातून शिंगणापूर जातात. ही काठी शिखर शिंगणापूरात मानाची काठी आहे. ही काठी परत भातागळी गावात आल्यानंतर गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेला येते. या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परीसरातील भक्त मोठ्यासंख्येने हजेरी लावतात. यात महीला भक्तांची संख्या लक्षणीय असते. या दिवशी पासून मोठी यात्रा भरते ही यात्रा तीन दिवस असते.

या यात्रेसाठी जे गावातील नागरीक काम धंद्यासाठी, नोकरीला बाहेर गावी गेले आहेत. ते गावाकडे येतात.नवस बोललेले भाविक या यात्रे दरम्यान नवस फेडतात. परीसरातील भाविक ही मोठ्याप्रमाणात यात्रेस येतात. पण शेकडो वर्षाच्या इतिहासात प्रथमच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व धार्मिक,यात्रा यासह आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भातागळी गावात गुढी पाडव्याला संपुर्ण गावात एकच गुढी उभारली जाते. ती आज उभारली गेली नाही. त्यात मंदीराला संचारबंदी लागल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जण घरातच पुजाआर्चा करत आहे.

Web Title: coronavirus: Gudhipadwa not celebrated in Shanbho Mahadev Mandir of Lohara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.