coronavirus: काेराेना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा गुरुजी घेणार शाेध!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:14 AM2021-04-02T05:14:41+5:302021-04-02T05:15:20+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांवरील शिक्षकांच्या मदतीने आता गावागावांतील काेराेना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेण्यात येणार आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांवरील शिक्षकांच्या मदतीने आता गावागावांतील काेराेना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेण्यात येणार आहे. एवढेच नाही तर डाेअर-टू-डाेअर जाऊन काेराेनाच्या अनुषंगाने जनजागृती करणे, लाेक मास्क वापरताहेत की नाही, यावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांनी शिक्षकांवर साेपविली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात प्रतिदिन दाेनशे ते सव्वादाेनशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययाेजना हाती घेतल्या आहेत. एखाद्या गावातील वाॅर्डात वा प्रभागात काेराेनाग्रस्त आढळून आल्यास संबंधिताच्या संपर्कात नेमके काेण-काेण आले हाेते, हे शाेधणे अत्यंत गरजेचे असते. हे काम सध्या आराेग्य यंत्रणेच्या माध्यमातून केले जात आहे. परंतु, दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, ही यंत्रणा पुरेशी नाही.
त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांतील शिक्षकांची या कामात मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम चाेख पार पाडले जावे, यासाठी जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर स्वतंत्र कमिट्या असणार आहेत. या कामाचे थेट सीईओंना रिपाेर्टिंग केले जाणार आहे.
साेलापूरच्या धर्तीवर उपक्रम
उस्मानाबादला लागून असलेल्या साेलापूर जिल्हा परिषदेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या माध्यमातून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेणे, चाचणी करण्यास भाग पाडणे, नियमांची अंमलबजावणी हाेते की नाही, यावर लक्ष ठेवले जात आहे.
साेलापूर जिल्ह्यातील शिक्षकांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
समाजामध्ये शिक्षकांना मानाचे स्थान आहे. हीच बाब लक्षात घेऊन काेराेनाच्या अनुषंगाने जनजागृती करणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेऊन त्यांना किमान टेस्ट करून घेण्यासाठी प्राेत्साहित केल्यास लाेक निश्चित ऐकतील. आराेग्य यंत्रणेला त्याची निश्चित मदत हाेईल.
- डाॅ. विजयकुमार फड, सीईओ, जिल्हा परिषद, उस्मानाबाद