coronavirus : कळंबच्या एका बाधिताची प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी सोलापूरला हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 03:57 PM2020-05-15T15:57:18+5:302020-05-15T15:57:57+5:30
अन्य दोन बाधितांवर कळंब येथेच उपचार सुरु आहेत़
उस्मानाबाद : कळंब शहरातील महसूलचा कर्मचारी असलेल्या एका ३४ वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाली आहे़ त्याची दोन वर्षांपूर्वी किडनी ट्रान्सप्लांट केलेली आहे. बाधित तरुणाची प्रकृती चिंताजनक असून याठिकाणी किडणीतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्यास सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
या तरुणाचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटीव्ह आला होता़ तो कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल होता़ मात्र, पहाटे त्यास श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ दरम्यान, या बाधित तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने व याठिकाणी किडणीतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़ अन्य दोन बाधितांवर कळंब येथेच उपचार सुरु आहेत़ या तिन्ही बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत.