coronavirus : उस्मानाबाद @ २६४; परंडा, उमरग्यातील ९ रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:58 PM2020-07-04T17:58:11+5:302020-07-04T18:00:59+5:30
जिल्ह्यातील विविध रूग्णालयांकडून शुक्रवारी १९२ स्वॅब लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.
उस्मानाबाद : लातूर येथील प्रयोगशाळेत पेंडिंग असलेल्या २३ स्वॅबचा अहवाल शनिवारी दुपारी ३ वाजता जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाला. त्यानुसार बाधितांच्या संख्येत आणखी ९ ने भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची रूग्णसंख्या २६४ वर जाऊन ठेपली आहे.
जिल्ह्यातील विविध रूग्णालयांकडून शुक्रवारी १९२ स्वॅब लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अहवाल प्राप्त झाला असता, ७ स्वॅब पॉझिटिव्ह आले होते. तर २३ नमुने पेंडिंग होते. याचा अहवाल शनिवारी दुपारी ३ वाजता आला असता, आणखी ९ नमुने पॉझिटिव्ह आले. यामध्ये उमरगा शहरातील महादेव गल्ली, गुंजोटी आणि एकोंडी येथील प्रत्येकी एक तर परंडा तालुक्यातील नालगाव येथील सहा स्वॅबचा समावेश आहे. परिणामी आता जिल्ह्यातील आधितांची संख्या २६४ वर जाऊन ठेपली आहे. यापैैकी १८४ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६८ जणांवर उपचार सुरू आहेत.