coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ हजार १५० वर; आज १२० रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 06:44 PM2020-08-08T18:44:30+5:302020-08-08T19:27:44+5:30
सध्या १ हजार २८८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
उस्मानाबाद : जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४१४ व्यक्तींचे स्वॅब औरंगाबाद व उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यापैकी ३५१ स्वॅबचा अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाला आहे़ यात १२० जणांच्या स्वॅबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे़ त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या २ हजार १५० झाली आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४१४ व्यक्तींचे स्वॅब औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व उस्मानाबाद येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्राच्या प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात आले होते़ यापैकी ३५१ स्वॅबचा अहवाल शनिवारी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला़ यात १२० जणांच्या स्वॅबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे़ २२५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ ६ जणांचा रिपोर्ट निष्कर्षाप्रत पोहोचला नाही़ ६३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत़ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील २७, तुळजापूर १३, उमरगा २५, कळंब १५, परंडा ३१, वाशी ८, भूम तालुक्यातील १ जणांचा समावेश आहे़ शनिवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात एकूण २,१५० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे़ ७९८ जण उपचाराअंती ठणठणीत झाले आहेत़ १ हजार २८८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे़