कोविड केअर सेंटर, अन्नछत्रालयचालकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:25+5:302021-06-09T04:40:25+5:30

उमरगा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटकाळात समाजातील अनेक संघटना आणि व्यक्तींनी सर्वसामान्य जनतेला आधार दिला आहे. अशा संघटनांचा ...

Covid Care Center, food hostel operator honored | कोविड केअर सेंटर, अन्नछत्रालयचालकांचा सन्मान

कोविड केअर सेंटर, अन्नछत्रालयचालकांचा सन्मान

googlenewsNext

उमरगा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटकाळात समाजातील अनेक संघटना आणि व्यक्तींनी सर्वसामान्य जनतेला आधार दिला आहे. अशा संघटनांचा रोटरी क्लबच्या वतीने ‘रोटरी सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. येथील ‘रोटरी क्लब डीजी व्हिजिट’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन झालेल्या मीटिंगमध्ये रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक गव्हर्नर हरीश मोटवानी यांनी हे पुरस्कार जाहीर केले. यावेळी रोटरीच्या अध्यक्ष कविता अस्वले, सचिव अनिल मदनसुरे, माजी गव्हर्नर डॉ दीपक पोफळे, असिस्टंट गव्हर्नर मेघराज बरबडे, क्लब ट्रेनर डॉ. संजय अस्वले यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरात कोरोनाच्या संकटकाळात विविध सामाजिक संघटना आणि व्यक्तींनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर तसेच अन्नछत्रालय सुरू केली आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाइकांनादेखील मोठा आधार मिळाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रोटरी सेवा गौरव पुरस्कार प्रत्यक्ष कोविड सेंटरला जाऊन प्रदान करण्यात आला. इदगाह सेंटरचे ख्वॉजा मुजावर, डॉ. राजकुमार कानडे, सतीश साळुंके, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचे किरण गायकवाड, नितीन होळे, पप्पू स्वामी, मनीष सोनी, शिवप्रसाद लड्डा, तालुका काँग्रेस कमिटी अन्नछत्रालयाचे शरद पाटील, क्लब ट्रेनर डॉ. संजय अस्वले, प्रवीण स्वामी, अमर परळकर, प्रा. युसूफ मुल्ला, प्रा. डॉ. रवी आळंगे, प्रा डॉ. सुधीर पंचकंले, माउली प्रतिष्ठान कोविड सेंटरचे उमाकांत माने, प्रशांत कुलकर्णी, डॉ. विनोद देवरकर, प्रवीण स्वामी, दाळींबच्या ज्ञानदीप कोविड सेंटरचे बाबा जाफरी, प्रा. युसूफ मुल्ला, रणजित बिराजदार, कविराज रेड्डी, स्वामी समर्थ अन्नछत्रालयाचे प्रवर्तक सिद्रमाप्पा चिंचोळे, ॲड. प्रवीण तोतला, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, उमेश चिंचोळे, शहरातील सर्व कोविड सेंटरमध्ये आणि कोविड हॉस्पिटलमध्ये नित्यनियमाने योगा-प्राणायाम धडे देणारे सुरेंद्र वाले, संजय ढोणे, शिवानंद दळगडे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या डीजी व्हिजिट उपक्रमांमध्ये रोटरी फाउंडेशनला निधी दिल्याबद्दल डॉ. अस्वले, मदनसुरे डॉ. नीलेश महामुनी, उमेश चिचोळे, संजय चालुक्य, मुन्ना पाटील, रणजित बिराजदार, विजय चिचोळे, अजित गोबारे, परमेश्वर सुतार त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. सूत्रसंचालन अध्यक्ष कविता अस्वले यांनी केले. आभार मदनसुरे यांनी मानले.

Web Title: Covid Care Center, food hostel operator honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.