६७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:40+5:302021-07-11T04:22:40+5:30
उमरगा तालुक्यात शुक्रवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे परिसरातून वाहणाऱ्या नद्या, ओढे दुथडी भरुन वाहत होत्या. मागील चोवीस ...
उमरगा तालुक्यात शुक्रवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे परिसरातून वाहणाऱ्या नद्या, ओढे दुथडी भरुन वाहत होत्या. मागील चोवीस तासात उमरगा मंडळात सर्वाधिक ९७.५ मिमी, मुळज ८९, दाळिंब ७०.८, मुरुम ४९ तर सर्वात कमी पाऊस नारंगवाडी मंडळात ४८.५ मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्यात आत्तापर्यंत सरासरी १२५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील एकूण ७५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत जवळपास ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कधी हलका तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला. पिकातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कोळपणी सुरू केली आहे. रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पिकाला पोषक वातावरण झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी केलेल्या क्षेत्रातील पिकाची स्थिती चांगली दिसत आहे. पट्टा किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवडीचे फायदे कृषी विभागाने सांगितले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली.