पाेलिसांना पाचारण केल्यानंतर गर्दी नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:54+5:302021-05-13T04:32:54+5:30
उमरगा -काेराेनाची लस घेण्यासाठी बुधवारी उमरग्यासह परिसरातील लसीकरण केंद्रांवर लाेकांनी माेठी गर्दी केली हाेती. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर ...
उमरगा
-काेराेनाची लस घेण्यासाठी बुधवारी उमरग्यासह परिसरातील लसीकरण केंद्रांवर लाेकांनी माेठी गर्दी केली हाेती. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर पाेलिसांना पाचारण करावे लागले. यानंतर गर्दी नियंत्रणात आली.
उमरगा उपजिल्हा रुग्णालयाने काेविड लसीकरण केंद्र शहरातील चिंचोळे हॉस्पिटलमध्ये सुरू केले आहे. या केंद्रावर बुधवारी पहाटेपासूनच हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु,पुरेशी लस उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन आराेग्य यंत्रणेकडून करण्यात येत हाेते. मात्र, गर्दी आटाेक्यात येत नव्हती. दरम्यान, गर्दी हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पाेलिसांना पाचारण करण्यात आले. पाेनि मुकुंद आघाव व सपाेनि सिद्धेश्वर गाेरे यांनी पथकासह लसीकरण केंद्राच्या ठिकाणी दाखल हाेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. संबंधित केंद्रावर अवघे ३४० डाेस उपलब्ध हाेते. केवळ ४५ वर्षावरील व दुसरा डाेस असणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आराेग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर कित्येकांचा हिरमाेड झाला. त्यामुळे त्यांना आल्या पावली परतावे लागले.
चाैकट...
उन्हाची परवा न करता लाेक रांगेत
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवते. अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात लाेक लस घेण्यासाठी रांगेत थांबून हाेते. लाेकांची रांग चक्क केंद्राबाहेर गेली हाेती. ही बाब लक्षात आल्यानंतर उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड यांनी लसीकरण केंद्राबाहेर टेंट मारून १०० खुर्च्याची साेय केली. ज्यामुळे ज्येष्ठ, महिलांची साेय झाली. एवढेच नाही तर संबंधितांना जारचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आले.