रुग्णालयांत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:09+5:302021-04-28T04:35:09+5:30
ढोकी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली ...
ढोकी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास बावणे यांनी नियोजनासाठी पोलिसांना पाचारण केले होते.
वादळी पाऊस
लोहारा : तालुक्यात अनेक भागांत रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. आठ दिवसांपासून उष्णतेत मोठी वाढ झाली होती. मात्र, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
मोमीन यांची निवड
तेर : येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी जुनेद मोमीन यांची निवड झाली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक नागनंदा मगरे यांनी मोमीन यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. विजय विश्वकर्मा, ग्रा. पं. सदस्य इरशाद मुलाणी, अमोल आग्रे, सुभाष कुलकर्णी आदी हजर होते.
अवैध धंदे वाढले
तुळजापूर : तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मटाका, जुगार, अवैध दारू विक्री यामुळे अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने कारवाईची मागणी होत आहे.
अपघाताचा धोका
(फोटो : २७)
उस्मानाबाद : शहरातील समता नगर भागात रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पालिका प्रशासनाने हा खड्डा बुजवून घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून करण्यात येत आहे.