छत्रपती कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:56+5:302021-06-09T04:40:56+5:30

बांधकाम कामगार व इतर कामगारांना ९० दिवस काम केलेले प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ग्रामसेवकांना आदेश असतानाही ...

Dam agitation of Chhatrapati Kamgar Sangh | छत्रपती कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

छत्रपती कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

googlenewsNext

बांधकाम कामगार व इतर कामगारांना ९० दिवस काम केलेले प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ग्रामसेवकांना आदेश असतानाही ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी छत्रपती कामगार संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. माकणी व जेवळी येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याचे अश्वासन यावेळी दिले. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड, उपाध्यक्ष बालाजी माटे, महासचिव तिम्मा माने, ग्रामीण समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय शेवाळे पाटील, उमरगा-लोहारा विधानसभा महासचिव बालाजी चव्हाण, उस्मानाबाद लातूर संपर्क प्रमुख अभिमन्यू कुसळकर, तालुकाध्यक्ष संजय दंडगुले, कार्याध्यक्ष दीपक तावडे, किशोर गायकवाड, उमरगा तालुकाध्यक्ष राम कांबळे, महादेव वाघमारे, दयानंद खरोसे, सुधीर सुरवसे, बालाजी सुरवसे, शिवाजी सगर, गोवर्धन पाटील, शंकर दंडगुले, आविनाश कांबळे आदी कामगार सहभागी झाले होते.

Web Title: Dam agitation of Chhatrapati Kamgar Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.