आत्मविश्वास दांडगा, सव्वासात हजारावर ज्येष्ठांची काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:21+5:302021-06-09T04:40:21+5:30

उस्मानाबाद -काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळून सुमारे ८ हजार २६० वृद्धांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र, मनाचा खंबीरपणा ...

Dandga confident, overcoming thousands of seniors in Savvas | आत्मविश्वास दांडगा, सव्वासात हजारावर ज्येष्ठांची काेराेनावर मात

आत्मविश्वास दांडगा, सव्वासात हजारावर ज्येष्ठांची काेराेनावर मात

googlenewsNext

उस्मानाबाद -काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळून सुमारे ८ हजार २६० वृद्धांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र, मनाचा खंबीरपणा आणि औषधाेपचाराला दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे सुमारे ७ हजार ३९५ ज्येष्ठांनी काेराेनाला चितपट केले. तर ८१२ वृद्ध काेराेना विरूद्धची लढाई हारले.

काेराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक आहे. या लाटेत जिल्हाभरातील साठ व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे ८ हजार २०७ वृद्धांना काेराेनाची लागण झाली. एकूण रूग्णसंख्येच्या हे प्रमाण १५.३१ टक्के एवढे आहे. संबंधित वृद्धांवर तालुका तसेच जिल्हा स्तरावरील काेविड रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचाराअंती सुमारे ७ हजार ३९५ वृद्धांनी काेराेनावर याशस्वीरीत्या मात केली आहे. तर उर्वरित ८१२ वृद्धांचा काेराेनाने बळी घेतला. दरम्यान, काेराेनामुळे मात केलेल्यांत ९० पेक्षा अधिक वय असणाऱ्यांची संख्याही काही काही कमी नाही. हा आखडा हजाराच्या घरात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यापैकी अनेक वृद्धांना व्हेंटिलेटर्स वा ऑक्सिजन बेडचीही गरज भासली नाही. काेविड केअर सेंटरमधून उपचार घेऊन ते ठणठणी झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

चाैकट...

६० वर्षावरील रूग्णांचे सर्वाधिक मृत्यू

साठ व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे ८ हजार २०७ वृद्धांना काेराेनाची लागण झाली हाेती. यापैकी उपचाराअंती ७ हजार ३९५ जण बरे हाेऊन घरी परतले. परंतु, यातील ८१२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हे प्रमाण ६४ टक्के एवढे आहे. इतर वयाेगटातील मृत्यू दरापेक्षा हे प्रमाण कईक पटीने अधिक आहे. दरम्यान, दगावलेल्यांमध्ये ४५ ते ५९ वयाेगटातील ३२२ व्यक्तींचा समावेश आहे. हे प्रमाण २५.४ टक्के एवढे आहे, असे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.

काेट..

कोरोनासारख्या आजाराला अजिबात घाबरलो नाही. डाॅक्टरांनी वेळाेवेळी सांगितलेली औषधे घेतली. त्यामुळे ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. भूम येथील ग्रामीण रूग्णालयातदहा दिवस उपचार घेतल्यानंतर ठणठणी हाेऊन घरी परतलाे.

-सीताराम वनवे, आनंदवाडी.

आपल्याला काेराेनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर मनामध्ये कसलीही भीती आणली नाही. तातडीने भूम येथील काेराेना केअर सेंटरमध्ये दाखल झाले. तेथील डाॅक्टरांनीही चांगले उपचार केले. त्यांनी दिलेली औषधे वेळेवर घेतली. त्यामुळे काेराेनावर काही दिवसांत मात केली.

-सुलाबाई वनवे, आनंदवाडी.

४५ ते ६० वयाेगटातील एकूण पाॅझिटिव्ह

१३८२०

बरे झालेल्या रूग्णांची संख्या

१४४९८

अशी आहे काडेवारी

पाॅझिटिव्ह

५५६७३

बळी

१२६८

Web Title: Dandga confident, overcoming thousands of seniors in Savvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.