विजांचा धोका, अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:30+5:302021-09-08T04:39:30+5:30
येत्या काही दिवसांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने याबाबत सतर्क केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ...
येत्या काही दिवसांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने याबाबत सतर्क केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम वगळता शक्यतो बाहेरचा प्रवास टाळावा. विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे. शेतीची कामे काही काळ थांबवावीत. आपण स्वत: किंवा पशुधन झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ थांबवू नयेत. नदी, नाले, ओढे तसेच तलाव, धरण परिसरात पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. पुलावरून पाणी वाहू शकते. अशावेळी ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षाने नागरिकांना केले आहे. तसेच प्रशासनातील प्रत्येक विभागानेही आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवून घटना, हानीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती त्वरेने द्यावी, असे कळविण्यात आले आहे.