अनाळा येथे कर्ज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:01+5:302021-03-15T04:29:01+5:30
परंडा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, अनाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अनाळा ...
परंडा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, अनाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अनाळा येथे महिला कर्ज मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अनुजा दैन व सरपंच जोतिराम क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक सावंत, उपशाखाधिकारी जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक माणिक सोनटक्के, निशिकांत क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य कल्याण शिंदे उपस्थित होते. या मेळाव्यात अनाळा, मलकापूर, कुक्कडगाव, चिंचपूर (खु.), देवगाव आदी गावांमधील ५० स्वयंसाहाय्यता समूहांना एकूण ५५ लाख रुपये कर्जमंजुरीचे पत्र देण्यात आले. या मेळाव्यासाठी प्रिया पाटील, समाधान माळी, चांदणे, नौशाद शेख, रेणुका सुर्वे, कृषी सखी राणी रेवडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समाधान माळी यांनी केले.