पावसाअभावी तलावाच्या पाणीपातळीत माेठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:16+5:302021-07-10T04:23:16+5:30
उमरगा येथे उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्रमांक दोन अंतर्गत उमरगा, लोहारा व तुळजापूर या तीन तालुक्यांतील सहा मध्यम प्रकल्पांसह एकूण ...
उमरगा येथे उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्रमांक दोन अंतर्गत उमरगा, लोहारा व तुळजापूर या तीन तालुक्यांतील सहा मध्यम प्रकल्पांसह एकूण १११ लघू व साठवण तलाव आहेत. तीन तालुक्यांत जून महिन्यापासून जुलै महिन्याच्या कालावधीत झालेल्या पावसाने सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी अधिक तीन तालुक्यांत पाऊस झाला आहे. गतवर्षी आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीपातळीत काही भागात वाढ झाली असली, तरी जिल्ह्यातील अनेक गावांच्या नागरिकांची तहान भागविणारे प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने तलाव जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उमरगा, लोहारा व तुळजापूर या तीन तालुक्यांत या वर्षी अद्यापही जोरदार पाऊस झाला नसल्याने, सहा मध्यम प्रकल्पांपैकी करनूर, खंडाळा, जकापूर, तुरोरी आणि बेनीतुरा प्रकल्पांत ७५ टक्क्यांच्या खाली तर हरणी प्रकल्पात ५० टक्क्यांच्या खाली पाणी उपलब्ध झाले, तरी भर उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. तीन तालुक्यांतील १०५ लघू साठवण तलावांपैकी १७ तलावांत ७५ टक्क्यांच्या खाली पाणीसाठा उपलब्ध आहे. ते ओव्हर फ्लो झाले आहेत. ६४ तलावांत ५० टक्क्यांच्या खाली, २० तलाव २५ टक्क्यांच्या खाली तर चार तलाव २५ जोत्याच्या पातळीखाली असून, येणाऱ्या काळात दमदार पाऊस नाही झाल्यास तीन तालुक्यांवर दुबार पेरणी व दुष्काळाची छाया गडद होत आहे. दोन तालुक्यांतील सहा मध्यम प्रकल्पांपैकी करनूर प्रकल्पात ५५.१६ टक्के, खंडाळा ५७.५७ टक्के तर हरणी ४०.७१ टक्के उपयुक्त साठा आणि जकापूर ६५.०९ टक्के, तुरोरी ५६.६१ टक्के, बेनीतुरा ५३.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यातील १०५ लघू व साठवण तलावांपैकी तुळजापूर तालुक्यात ७५ टक्क्यांखाली आठ तलाव त्यात भारती, अणदूर, कोळेगाव, हंगरगा (क्रमांक एक व दोन), किलज, मुर्टा, आलियाबाद, उमरगा तालुक्यात रामनगर, नारंगवाडी, दगडधानोरा, आलूर, अचलेर, केसरजवळगा (क्रमांक एक व दोन), डिग्गी तर लोहारा तालुक्यात बेलवाडी तलावात पाणीसाठा उपलब्ध आहे. तुळजापूर तालुक्यात ३५ तलावांत ५० टक्क्यांखाली असून, त्यात यमाई, कामठा, होर्टी (१/२) चिवरी, मसला, पळस निलेगाव, सिंदगाव (१/२), सलगरा, मुर्टा, शहापूर, सावरगाव, वडगाव, तामलवाडी, सिंदफळ, अपसिंगा, धोत्री, अरबली, देवसिंगा, देवकुरळी, कदमवाडी, सलगरा (दि.), नंदगाव, जळकोट, मंगरूळ, कसई, बंचाई, हंगरगा, ढेकरी, खंडाळा, येडोळा, वडगांव, कुंभारी, तडवळा, दिंडेगाव. उमरगा तालुक्यात १६ तलाव ५० टक्क्यांखाली आहेत. त्यात कोरेगांववाडी, कोळसूर, आलूर, कुन्हाळी, मुरळी, भुसणी, गुंजोटी, कदेर, तलमोड वाडी, वागदरी, सरोडी, भिकारसांगवी, कसगी, सुपतगाव, रामनगर, पेठसांगवी, काळनिंबाळा, कोरेगांव, गुंजोटीवाडी, बलसूर, कोराळ, जेवळी, कसमलवाडी तर लोहारा तालुक्यात पाच तलाव त्यात लोहारा, धानुरी, भोसगा, जेवळी, हिप्परगा रवा हे तलाव ५० टक्क्यांखाली आहेत.
चाैकट...
१६ तलावांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा
तुळजापूर तालुक्यात २५ टक्क्यांखाली १६ साठवण तलाव असून, त्यात हंगरगा, इटकळ, पिंपळा, अरळी, काटी, सांगवी (का.), सांगवी (मा.), कुनसावळी, चिवरी, आरळी, लोहगांव, वाणेगाव, केशेगाव, खुदावाडी, गंजेवाडी आणि निलेगाव. उमरगा तालुक्यांत दोन तलाव त्यात बलसूर (क्र. २), दाळिंब. लोहारा तालुक्यांत दोन तलाव त्यात माळेगाव व हिप्परगारवा, तुळजापूर तालुक्यात चार तलाव जोत्याच्या खाली असून, त्यात व्होर्टी क्रमांक एक, फुलवाडी, चिकुंद्रा व चिवरी क्रमांक दोन यांचा समावेश आहे.