जागेचे कबाले वाटप करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:51+5:302021-07-29T04:31:51+5:30
ताजखान नसीब खाँ पठाण सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, शिराढोण येथील ...
ताजखान नसीब खाँ पठाण सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, शिराढोण येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथील शासकीय गायरान जमीन गट नंबर २१५ या शासकीय जमिनीवर १९८२ पासून झोपडपट्टीवासीय निवासी आहेत. शिवाय, या जागेवर शासनाने १९८२ साली इंदिरा निवास योजनेतून शासनाने काही घरे बांधून दिलेले आहेत. तसेच १९९३ साली शासनाने काही महिलांना देखील या जागेवर खोल्या दिल्या आहेत. परंतु, यातील कुणालाच अद्याप कबाला मिळालेला नाही.
सन २०१७-१८ मध्ये शासनाने झोपडपट्टी कायम करण्यासाठी मोजणी करावी यासाठी भूमिअभिलेख विभागाकडे ३१५० रुपये मोजणी फी झोपडपट्टीवासीयांकडून भरून घेतली. परंतु पुढील कारवाई झाली नाही. या झोपडपट्टीवासीयांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चारशे घरकूल मंजूर झाले आहेत. परंतु, मालकी हक्काची जागा नसल्याने त्यांना घरकूल मिळत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.