साहित्य संमेलन रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:30+5:302021-02-24T04:33:30+5:30
——————————————— माजी विद्यार्थ्यांचा नळी येथे सत्कार अनाळा : भूम तालुक्यातील नळी येथील कै. सु.म. तरंगे आश्रमशाळेतील माजी विद्यार्थी किरण ...
———————————————
माजी विद्यार्थ्यांचा नळी येथे सत्कार
अनाळा : भूम तालुक्यातील नळी येथील कै. सु.म. तरंगे आश्रमशाळेतील माजी विद्यार्थी किरण राजू खाडे याची यूपीएससी परीक्षेद्वारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच बबन रामकिसन हराळ यांची कृषी साहाय्यकपदी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आश्रमशाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सचिव बिरमल तरंगे, दादासाहेब तरंगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिल खताळ, माध्यमिकचे मुख्याध्यापक दादासाहेब थोरात, आंधळे, कदम आदींनी विद्यार्थ्यांचे काैतुक केले.
———————————————
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
उस्मानाबाद : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २०२०-२१ मध्ये विविध आठ योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांच्या लाभासाठी ११ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे. या विभागामार्फत जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दहा अधिक एक शेळी गट वाटप करणे, जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दोन दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण आदी योजना राबविल्या जात आहेत.
———————————————
लोकशाहीदिनी गैरहजर राहिल्यास कारवाई
उस्मानाबाद : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन बैठक घेण्यात येते. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो. या बैठकीसाठी हजर राहण्यासाठी कार्यालयांना लेखी पत्र देऊन कळविण्यात येते. तथापि, संबंधित कार्यालयाचे प्रमुख या बैठकीस अनुपस्थित राहिल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा उमरगा येथील तहसीलदार संजय पवार यांनी दिला आहे.
———————————————
पांगरदरवाडीत २६ शिवभक्तांचे रक्तदान
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २६ शिवभक्तांनी रक्तदान केले. यात महिला रक्तदात्यांचाही पुढाकार दिसून आला. या वेळी तामलवाडीचे स.पो.नि. सचिन पंडित, सरपंच विजय निंबाळकर, पोलीस पाटील दादासाहेब मारडकर, प्रताप निंबाळकर, सोमनाथ शिंदे, डॉ. अश्विनी गोरे, दिनकर सुपेकर, गणेश साळुंके, सुषमा घोडके, महादेव जाधव, महेश सावंत, मंगेश कदम, ऋषिकेश टिंगरे, अमिर पठाण, प्रमोद कदम, शंकर गाटे आदी उपस्थित होते.