ग्रंथालय अनुदान वाढीसह दरमहा वेतनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:21 AM2021-07-03T04:21:06+5:302021-07-03T04:21:06+5:30
उमरगा : राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात तिप्पट वाढ करून ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय ...
उमरगा : राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात तिप्पट वाढ करून ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाने मुख्यमंत्री व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथालयात काम करणारे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून वेतनश्रेणी व सेवा शर्तींची मागणी करीत आहेत. परंतु त्यांना किमान वेतनही मिळत नाही. शिवाय, जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालयाना मिळणारे तूटपुंजे अनुदानही टप्प्याटप्प्याने मिळत असल्याने सार्वजनिक ग्रंथालय चळवळ अडचणीत आली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर वेतन, पेन्शन योजना व वैद्यकीय योजना लागू करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. यावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य गोपाळ अहंकारी, ग्रंथमित्र प्रवीण अणदूरकर, देवानंद शिंदे, भगवान कांबळे, महेबूब पठाण, भालचंद्र सूर्यवंशी, गहिनीनाथ बिराजदार, अमर जाधव, सत्यनारायण जाधव, पंडित सुरवसे, दत्तात्रय पाटील, व्यंकट काळे, एकंबे जीवन आदींच्या सह्या आहेत.