रस्ता दुरूस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:30+5:302020-12-27T04:23:30+5:30
अतिक्रमण हटविण्याची मागणी भूम - बसस्थानक परिसर, गोलाई चौक तसेच परंडा रोडलगत माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ...
अतिक्रमण हटविण्याची मागणी
भूम - बसस्थानक परिसर, गोलाई चौक तसेच परंडा रोडलगत माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने पायी चालने अवघड झाले आहे. नगर परिषदेने संबंधित अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी शहरवासियांतून हाेत आहे.
आलमप्रभूच्या नवरात्राैत्सवानिमित्त कार्यक्रम
भूम - श्री आलमप्रभू देवस्थान नवरात्र उत्सवास २१ डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. या कालावधीत रोज नंदादिप महाअभिषेक, पहाटे व सायंकाळी महाआरती, दुपारी अन्नदान आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी दत्त जयंती सोहळा होणार आहे.
नागरिकांना पडला मास्कचा विसर
भूम - काेराेनाचा संसर्ग ओसरला असला तरी धाेका टळलेला नाही. असे असतानाही भूम शहरात वावरताना बहुतांश लाेक मास्कविना वावरत आहेत. त्यामुळे अशा मंडळीविरूद्ध पाेलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा मास्क न वापरणार्यांच्या संख्येत वाढ हाेऊ शकते.
‘बाणगंगा’च्या भरावावर झुडपे वाढली
भूम - यंदा झालेल्या जाेरदार पावसामुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाणगंगा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. असे असतानाही या प्रकल्पाच्या भरावावर वाढलेली झाडे-झुडपे ताेडण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे,अशी मागणी हाेत आहे.