मी आहे तिथे समाधानी, पुढची २० वर्षं मोदींनीच देशाचं नेतृत्त्व करावं - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 04:35 PM2023-06-16T16:35:29+5:302023-06-16T16:36:03+5:30
Devendra Fadnavis : महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
धाराशिव : लोक शुभेच्छा व्यक्त करत असतात पण मला वाटते की, पुढची २० वर्षे नरेंद्र मोदींनींच देशाचं नेतृत्व करावं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते धाराशिव दौऱ्यावर असून तिथे त्यांनी तुळजापूर मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. खरं तर देशाचे नेतृत्व करायची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळावी, असं साकडं तुळजापूर मंदिरात पुजाऱ्यांनी घातले. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पुढची २० वर्ष मोदींनींच देशाचं नेतृत्व करावं, असे फडणवीसांनी नमूद केले. ते धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
"लोक आपापल्या शुभेच्छा व्यक्त करतात पण मी ज्या ठिकाणी आहे तिथे पूर्णपणे समाधानी आहे. तसेच महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि देशामध्ये इतके सक्षम नेतृत्व आहे की, आमचं म्हणणं आहे पुढची २० वर्षे मोंदींनीच देशाच नेतृत्व करावं", असे फडणवीसांनी सांगितले.
🕞3.32pm | 16-06-2023 📍Tuljapur (Dharashiv) | दु. ३.३२ वा. | १६-०६-२०२३📍 तुळजापूर (धाराशिव)
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2023
LIVE | Media interaction https://t.co/3lB5rNt4lT
आई तुळजाभवानीनं शक्ती दिल्यास लवकरच मंत्रिमंडळ विस्तार - फडणवीस
तसेच आई तुळजाभवानीचं दर्शन घेणं ही देखील महत्त्वाची बाब आहे. मी अनेकदा आईचं दर्शन घेतलं आहे पण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आमदार राणा पाटील यांच्या आग्रहाखातर इथे दर्शनासाठी आलो, असेही फडणवीसांनी म्हटले. आमदार राणादादा पाटील यांना मंत्रीपद मिळावं यासाठी देखील साकडं घातलं जातंय या प्रश्नावर फडणवीसांनी सावधपणे उत्तर दिले. "आई तुळजाभवानीने शक्ती दिली तर लवकरच विस्तार होईल", असे विधान त्यांनी केले. दरम्यान, सगळ्या पक्षांना वाटते की, आपण निवडणूक लढवली पाहिजे. आम्हालाही हे असेच वाटते पण याबद्दल सर्व वरिष्ठ बसून चर्चा करतील मग निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेबद्दल म्हटले.