संत गोरोबा काकांच्या शिलालेखाची झीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:34+5:302021-02-24T04:33:34+5:30

तेर येथील संत गोरोबा काका यांच्या समाधी मंदिराला साडेसातशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भागातून भाविक येतात. ...

Destruction of the inscription of Saint Goroba Kaka | संत गोरोबा काकांच्या शिलालेखाची झीज

संत गोरोबा काकांच्या शिलालेखाची झीज

googlenewsNext

तेर येथील संत गोरोबा काका यांच्या समाधी मंदिराला साडेसातशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भागातून भाविक येतात. या मंदिराचे महत्व सांगणारा देवनागरी भाषेतील शिलालेख मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस दुर्लक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे. अनेकांना हा शिलालेख असल्याचे माहितीही नाही. तो उघड्यावरच असल्याने ऊन - पावसापासून त्याचा बचाव होत नाही. परिणामी, आता या शिलालेखावर वर्णित अक्षरे अस्पष्ट होत चालली आहेत. पूर्ण वाक्याचाही बोध होणे यामुळे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने या शिलालेखाचे संवर्धन करावे व त्यावर वर्णित मजकूर एका फलकावर मुद्रित करून येथे येणाऱ्या भाविकांपर्यंत मंदिराची महती पोहोचविण्यात मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

...इतकीच अक्षरे दिसतात

शिलालेखाची झीज झाली असल्याने संपूर्ण अक्षरे ओळखू येत नाहीत. देवनागरी भाषेत ६ ओळी कोरण्यात आल्या आहेत. पहिल्या ओळीतील गोराेबा काका ही अक्षरे दिसून येतात. झीज जास्त झाल्याने दुसरी, तिसरी व चौथी ओळ अस्पष्ट झाली आहे. पाचव्या ओळीत तेणे म असा शब्दोल्लेख दिसतो, तर सहाव्या ओळीत डपु केला. ही दोन अक्षरे स्पष्ट दिसून येत आहेत. शिवाय, गोरोबा काकांच्या समाधीवरील छत ज्या भक्ताने बांधले, त्यांचा नामोल्लेखही दिसून येतो. मात्र, इतर अनेक अक्षरे नष्ट होत चालली आहेत.

230221\23osm_1_23022021_41.jpg

संत गोरोबा काका यांच्या मंदिरातील महती सांगणार्या याच शिलालेखाची झीज सुरु आहे.

Web Title: Destruction of the inscription of Saint Goroba Kaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.