६२२ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे ‘प्लॅन प्लस’वर; निधी नियोजनात उस्मानाबाद जिल्हा राज्यात तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 02:01 PM2021-03-16T14:01:18+5:302021-03-16T14:06:20+5:30

निधी याेग्य पद्धतीने खर्च व्हावा, त्यात पारदर्शकता यावी यासाठी ग्रामपंचायतींना विकासकामांचे आराखडे करण्याचे निर्देश दिले हाेते.

Development plans of 622 gram panchayats on 'Plan Plus'; Osmanabad district ranks third in the state in fund planning | ६२२ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे ‘प्लॅन प्लस’वर; निधी नियोजनात उस्मानाबाद जिल्हा राज्यात तिसरा

६२२ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे ‘प्लॅन प्लस’वर; निधी नियोजनात उस्मानाबाद जिल्हा राज्यात तिसरा

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात अव्वल, राज्यात तिसराआठही तालुक्यांना या कामामध्ये पहिली रॅंक मिळाली आहे.

उस्मानाबाद : पंधराव्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना माेठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध हाेताे. कामांचे नियाेजन करून निधी खर्च झाल्यास गावांचा सर्वांगीण विकास हाेण्यास मदत हाेते. हीच बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतींना विकासकामांचे वर्षभराचे नियाेजन करण्याचे फर्मान शासनाने काढले हाेते. हे नियाेजन ‘प्लॅन प्लस’ या आज्ञावलीवर अपलाेड करणे बंधनकारक हाेते. त्यासाठी १५ मार्चची डेडलाईन दिली हाेती. त्यानुसार मुदतीत काम पूर्ण करत जिल्ह्यातील सर्व ६२२ ग्रामपंचायतींनी विकास आराखडे ऑनलाईन केले आहेत. त्यामध्ये उस्मानाबाद मराठवाड्यात अव्वल तर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विकासकामांना गती यावी, आर्थिक गैरप्रकार कमी व्हावेत, यासाठी शासनाकडून थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी दिला जात आहे. हा निधी याेग्य पद्धतीने खर्च व्हावा, त्यात पारदर्शकता यावी यासाठी ग्रामपंचायतींना विकासकामांचे आराखडे करण्याचे निर्देश दिले हाेते. हे आराखडे ऑनलाईन करण्यासाठी ‘प्लॅन प्लस’ ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. यावर हे सर्व आरखडे अपलाेड करण्यासाठी ग्रामपंचायतींना १५ मार्चची डेडलाईन देण्यात आली हाेती. हे काम मुदतीत पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून वेळाेवेळी बैठका घेतल्या. गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांना मार्गदर्शन करून कामाला गती दिली. त्यामुळे जिल्हाभरातील ६२२ ग्रामपंचायतींची माहिती मुदतीच्या आत ‘प्लॅन प्लस’वर अपलाेड झाली आहे. यात उस्मानाबादने मराठववाड्यातून अव्वल क्रमांक पटकाविला आहे, तर राज्यातून तृतीय. उस्मानाबादनंतर मराठवाड्यातीलच हिंगाेलीचा क्रमांक लागताे.

पहिल्या रॅंकमध्ये सर्वच तालुके...
‘प्लॅन प्लस’ या आज्ञावलीमध्ये विकास आराखडे अपलाेड करण्यामध्ये जिलह्यातील सर्वच तालुक्यांनी झेप घेतली आहे. आठही तालुक्यांना या कामामध्ये पहिली रॅंक मिळाली आहे. यामध्ये भूम तालुक्यातील ७४, तुळजापूर १०८, लाेहारा ४४, वाशी ४२, उमरगा ८०, उस्मानाबाद १११, कळंब ९१ आणि परंडा तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

‘प्लॅन प्लस’ या आज्ञावलीमध्ये विकासकामांचे आराखडे मुदतीत अपलाेड व्हावेत, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळाेवेळी बैठका घेण्यात आल्या. या माध्यमातून कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. आपण हे काम मुदतीत पूर्ण केले आहे.
-नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

Web Title: Development plans of 622 gram panchayats on 'Plan Plus'; Osmanabad district ranks third in the state in fund planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.