उमरगा येथे खासदार आठवलेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:59 PM2018-12-10T15:59:20+5:302018-12-10T16:00:36+5:30
रिपाइंसह विविध संघटनांनी एकत्रित येत तहसील कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केले़
उमरगा (उस्मानाबाद ) : केंद्रीय मंत्री खा़ रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी रिपाइंसह विविध संघटनांनी एकत्रित येत तहसील कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केले़
अंबरनाथ येथील घटनेच्या निषेधार्थ रिपाइं (आ़) कोळी महासंघ, युवा भीमसेना, लहुजी शक्ती सेना, यमराज ग्रुपच्या पदाधिकारी, सदस्यांनी सोमवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केले़ हल्लेखोर प्रविण गोसावी याच्यासह मुख्य सुत्रधारास अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ रिपाइंचे उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्तारोको करण्यात आला़
यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय कांबळे, कोळी महासंघचे जिल्हाध्यक्ष महादेव सलके, युवा भीमसेनाचे जिल्हाध्यक्ष संजय क्षीरसागर, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष विजय तोरडकर आदींनी मनोगत व्यक्त करीत घटनेचा निषेध केला़ या हल्ल्यामागील मुख्य सुत्रधारास तात्काळ अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला़
यावेळी रिपाइंचे तालुका संघटक अजिज शेख, शहराध्यक्ष दीपक झाकडे, शहर उपाध्यक्ष बबलू सरपे, शहर संपर्क प्रमुख सिद्धार्थ सोनकांबळे, चंद्रकांत सोनकांबळे, तानाजी शिंदे, विशाल सुरवसे, कपिल कांबळे, समीर सुरवसे, धनराज गायकवाड, शिवाजी गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पाऊण तास चाललेल्या रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.