‘जि. प.’च्या कामकाजाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:34+5:302021-09-08T04:39:34+5:30

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होणार आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ...

‘Dist. P.'s work will begin with the national anthem | ‘जि. प.’च्या कामकाजाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने

‘जि. प.’च्या कामकाजाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने

googlenewsNext

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होणार आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तातडीने जारी करावेत, असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता कांबळे यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. राऊत, पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जलसंधारण विभागाचे वि. वि. जोशी आणि समाज कल्याण अधिकारी चौगुले यांची उपस्थिती होती.

सकाळी ९.४५ ही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे. आपण स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. त्या अनुषंगाने दररोज सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राष्ट्रगीताने जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात व्हावी. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाला आदेश द्यावेत, अशा सूचना अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी यावेळी दिल्या.

Web Title: ‘Dist. P.'s work will begin with the national anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.