पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:37 AM2021-08-14T04:37:49+5:302021-08-14T04:37:49+5:30

कोरोनामुळे सर्वांचीच परिस्थिती दयनीय असतानाच २२ व २३ जुलै रोजी कोकणसह कोल्हापूर,सांगली, सातारा आदी जिल्ह्यात महापुराने अक्षरश: थैमान घातले ...

Distribution of educational material kits for flood affected students | पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे किट वाटप

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे किट वाटप

googlenewsNext

कोरोनामुळे सर्वांचीच परिस्थिती दयनीय असतानाच २२ व २३ जुलै रोजी कोकणसह कोल्हापूर,सांगली, सातारा आदी जिल्ह्यात महापुराने अक्षरश: थैमान घातले होते. पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती पाहून किल्ले, काक्रंबा बीडमधील काही शिक्षकांनी एकत्र येत पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे किट वाटपाचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार १२५ किट तयार करून वाटप केले. राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबचे बिपीन शिंदे व प्रसाद डांगे यांनीही मदत केली. याकामी केंद्रप्रमुख अशोक स्वामी, काक्रंबा केंद्रप्रमुख सतीश हुंडेकरी, मुख्याध्यापक बाबुराव चव्हाण, सोळसे, सहशिक्षक उमेश सुर्वे, प्रशांत माने, विजय माने, प्रदीप माननीय आदींची उपस्थिती हाेती.

130821\img-20210810-wa0091.jpg

चिपळूण तालुक्‍यातील प्राथमिक शाळेत किलज व काक्रंबा बीडचे शिक्षक किट वाटप करताना

Web Title: Distribution of educational material kits for flood affected students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.