अंगणवाड्यांच्या रंगरंगोटीसाठी निधीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:34 AM2021-04-02T04:34:33+5:302021-04-02T04:34:33+5:30
‘सुंदर माझं कार्यालय’ या उपक्रमांतर्गत अनेक शासकीय कार्यालय, इमारती कात टाकत आहेत. यातून त्या इमारतीचा कायापालट केला जात आहे. ...
‘सुंदर माझं कार्यालय’ या उपक्रमांतर्गत अनेक शासकीय कार्यालय, इमारती कात टाकत आहेत. यातून त्या इमारतीचा कायापालट केला जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागातील बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांना मात्र निधीची उपलब्धता नसल्याने अडचण येत होती. यातच याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांनाही म्हणावे असे मानधन नसते.
यामुळे भारतीय परिवर्तन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक ताटे, ईटकूर गटाच्या जि. प. सदस्या राधाताई दिपक ताटे यांनी अशा अंगणवाडीच्या रंगरंगोटी व सुशोभीकरणासाठी रोख मदत करण्याचा निर्णय घेतला.
हा निधी वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला.
यावेळी दीपक ताटे, राधाताई ताटे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद कुसनेन्नीवार, विस्तार अधिकारी भागवत जोगदंड, मंडळ अधिकारी एन. बी. भिसे, पत्रकार लक्ष्मण शिंदे, भाजपाचे तालुका उपप्रमुख प्रदीप फरताडे, बाबूराव जाधव, ग्रा. पं. सदस्या कविता फरताडे, विनोद चव्हाण, आण्णा काळे उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक संयोजक लक्ष्मण शिंदे यांनी केले तर आभार सायली रणदीवे यांनी मानले.