गुंजोटीत विविध पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:40 AM2021-02-25T04:40:16+5:302021-02-25T04:40:16+5:30

गुंजोटी : आधार फाऊंडेशन व सुलतान सेठ मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हुतात्मा वेदप्रकाश वाचनालयाचा शुभारंभ तसेच घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा व ...

Distribution of various awards at Gunjoti | गुंजोटीत विविध पुरस्कारांचे वितरण

गुंजोटीत विविध पुरस्कारांचे वितरण

googlenewsNext

गुंजोटी : आधार फाऊंडेशन व सुलतान सेठ मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हुतात्मा वेदप्रकाश वाचनालयाचा शुभारंभ तसेच घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा व आदर्श पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी उमरगा उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहियोद्दीन सुलतान होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, सेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. विजय जाधव, डॉ. सुनंदा जाधव, डॉ. सुहास भोसले, डॉ. युवराज चव्हाण, सरपंच सरस्वती कारे, उपसरपंच आयुब मुजावर, मंदाकिनी पाटील, बलभीम शाईवाले, ओमप्रकाश शिंदे, दीपक चव्हाण आणि विश्वनाथ कदेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रा. इब्राहीम इनामदार यांना आदर्श पत्रकार, आर. आर. पाटील यांना आदर्श शिक्षक तर शुभम चव्हाण यांना युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेत वैष्णवी अहंकारी, वीणा जाधव, संतोषी गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय तर सागर शिंदे, सुनील जाधव यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. याबद्दल त्यांचा तसेच ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास आधार फाऊंडेशन व सुलतान सेठ मित्र मंडळाचे पदाधिकारी अमोल चव्हाण, योगेश शिंदे, रतन जाधव, डॉ. युवराज चव्हाण, गणेश चौधरी, नदीम मुजावर, उस्मान सय्यद, आकाश शिंदे, प्रसाद शिंदे, विशाल ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, विशाल पांचाळ, सतीश कारे, नितीन वाघमोडे, अमर शिंदे, विशाल शिंदे, विशाल कोळनूरे, प्रवीण शिंदे, स्वप्निल शिंदे, राजू शिंदे, निखिल शाईवाले, संतोष जाधव आदींनी पुढाकार घेतला. ब. रा. पुरंत यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण जोगे यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of various awards at Gunjoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.