जिल्हा काॅंग्रेस कमिटीने नोंदविला भाजप सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:39+5:302021-06-01T04:24:39+5:30

उस्मानाबाद : भाजपा सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात ...

District Congress Committee reports protest against BJP government | जिल्हा काॅंग्रेस कमिटीने नोंदविला भाजप सरकारचा निषेध

जिल्हा काॅंग्रेस कमिटीने नोंदविला भाजप सरकारचा निषेध

googlenewsNext

उस्मानाबाद : भाजपा सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविला. तसेच केंद्रातील भाजपप्रणित सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती.

३० मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सत्तेत येण्याअगोदर देशातील जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून व वचननाम्यात प्रलोभने दाखवून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर देशातील गोरगरीब जनतेच्या हिताच्या योजना अमलात आणण्याऐवजी बड्या उद्योगपतींसाठीच सत्तेचा वापर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वर्षांत देशाचा विकास करण्याऐवजी देश भकास केल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र सरकाराचा निषेध नोंदविला.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले. तसेच लसीकरणातही ते अपयशी ठरलेले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसचे वाढते भाव आणि महागाईही दिवसेंदिवस वाढत आहे. देशाची ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची दुर्दशा झाली. त्यामुळे बेरोजगारीही वाढली. त्यामुळे सर्वच घटकांत केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष पसरला आहे. त्यातच मागील वर्षी शेतकरीविरोधी काळे कायदे लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की ओढवली आहे. असे असतानाही नरेंद्र मोदी यांनी देशातील दोन उद्योगपतींसाठी रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनल. पेट्रोलियम कंपन्या, बँका अशा सरकारी आस्थापना विक्रीस काढल्याने देशाचा विकास थांबला आहे. देशाच्या हितासाठी केंद्रातील भाजपाप्रणित सरकार बरखास्त करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.

या निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, विश्वास शिंदे, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, मुख्य संघटक राजेंद्र शेरखाने, लक्ष्मण सरडे, अश्निवेश शिंदे, राज कुलकर्णी, रोहित पडवळ, मुकुंद पाटील, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, संजय गजधने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: District Congress Committee reports protest against BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.