काेराेनाग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा कचेरीची ‘हेल्पलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:06+5:302021-04-18T04:32:06+5:30
मागील काही दिवसांपासून काेराेना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. तसेच मृत्यूचे वाढते प्रमाणही चिंता वाढवत आहे. अशा संकटकाळत काेराेनाग्रस्तांसह ...
मागील काही दिवसांपासून काेराेना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. तसेच मृत्यूचे वाढते प्रमाणही चिंता वाढवत आहे. अशा संकटकाळत काेराेनाग्रस्तांसह नातेवाइकांना रुग्णांलयाची नावे, त्यामध्ये विना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनसह असलेले बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, आदी बाबींची माहिती मिळविताना नाकीनऊ येत आहे. ही गैरसाेय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार जिल्हा कचेरीमध्ये स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. रुग्णांसह नागरिकांना ०२४७२-२२४४४४, ०२४७२-२२५६१८, ०२४७२-२२६९२७ व १०७७ हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सेवा २४ तास सुरू राहणार आहे. यासाठी दाेन शिप्टमध्ये चार कर्मचारी नियुक्त केले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी समस्याही मांडता येणार आहेत. या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.