गणेशोत्सवात कसल्याही मिरवणुका काढू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:34+5:302021-09-09T04:39:34+5:30

तुळजापूर : गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच श्रींची स्थापना ...

Do not take out any procession during Ganeshotsav | गणेशोत्सवात कसल्याही मिरवणुका काढू नका

गणेशोत्सवात कसल्याही मिरवणुका काढू नका

googlenewsNext

तुळजापूर : गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच श्रींची स्थापना किंवा विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी केले.

येथील पोलीस ठाण्यात बुधवारी शांतता समिती सदस्य, गणेश मंडळ, पोलीस मित्र व इतर प्रशासकीय कार्यालय अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. काशीद म्हणाले, कोरोनाचे संकट अजून कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी लागणार आहे. सर्व गणेश मंडळांनी ऑनलाइन परवाने काढणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटाचे बसवावेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण हॊणार नाही, याची काळजी घ्यावी. मूर्तीच्या सुरक्षेकरिता २४ तास दोन स्वयंसेवक ठेवण्यात यावेत. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, महंत मावजीनाथ बुवा यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, पुजारी मंडळ उपाध्यक्ष विपीन शिंदे, महंत अरण्य बुवा, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे, जीवन कदम, प्रक्षाळ मंडळाचे विशाल रोचकरी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, छावा संघटनेचे महेश गवळीसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस कर्मचारी रवी भागवत यांनी केले.

080921\img-20210908-wa0015.jpg

तुळजापूर येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद व इतर....

Web Title: Do not take out any procession during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.