कामे करा, अन्यथा कारवाईला सामाेरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:36 AM2021-08-28T04:36:43+5:302021-08-28T04:36:43+5:30
तुळजापूर : गाेरगरिबांच्या कल्याणासाठी सरकारकडून विविध याेजना हाती घेण्यात येत आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाताे, परंतु अनेक ...
तुळजापूर : गाेरगरिबांच्या कल्याणासाठी सरकारकडून विविध याेजना हाती घेण्यात येत आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाताे, परंतु अनेक वेळा कारणे सांगून याेजनांना गती देणे टाळले जाते. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. विकास कामे झाली नाही, तर त्यांना कारवाईला सामाेरे जावे लागेल, असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिला.
तुळजापूर पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल खोचरे, पंचायत समिती सभापती रेणुका इंगोले, उपसभापती दत्ता शिंदे, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, जगन्नाथ गवळी, शहरप्रमुख सुधीर कदम, अमीर शेख, सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
बैठकीला सुरुवात हाेता, याेजनानिहाय आढावा सुरू करण्यात आला. सुरुवातीला पाणीपुरवठा याेजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही कामे आवश्यक गतीने हाेत नसल्याचे समाेर आल्यानंतर, पुढील बैठकीपर्यंत कामे गतिमान झाल्याचे दिसले पाहिजे, असे ते म्हणाले. यानंतर, जलसंधारण, बांधकाम, आराेग्य, शिक्षण, कृषी, तसेच शेतरस्ते, पशुधनासाठीच्या गाेठ्यांचाही आढावा घेतला. आलेल्या प्रस्ताव धूळखात न ठेवता, ताताडीने मंजुरी द्यावी. ग्रामस्थांना एका कामासाठी चार वेळा चकरा मारण्याची वेळ आणू नका, अशा तक्रारी आल्या, तर संबंधित अधिकारी वा कर्मचारी यांनी कारवाईला सामाेरे जाण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी म्हटले. उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी मरोड यांनी मानले. बैठकीस संजय भोसले, राहित चव्हाण, प्रदीप मगर, बापूसाहेब नाईकवाडी, दिनेश रसाळ, प्रतीक रोचकरी, चेतन बंडगर, बालाजी पांचाळ, अनिल भोपळे, महेंद्र सुरवसे, अनिल छत्रे, सिद्धाराम कारभारी, जयप्रकाश दरेकर, कृष्णा दरेकर, दादाराव पारवे, सौदागर साप्ते, बालाजी डांगे, नेताजी पवार आदी उपस्थित हाेते.