जप्त केलेला माल ठेवण्यासाठी पुरेशी जागा देता का जागा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:33 AM2021-03-17T04:33:21+5:302021-03-17T04:33:21+5:30
उस्मानाबाद : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मात्र, जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी पुरेशी जागा ...
उस्मानाबाद : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मात्र, जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने कुणी जागा देता का... जागा अशी याचना करण्याची वेळ उस्मानाबादेतील अन्न व औषध प्रशासन विभागावर आली आहे.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या लगत भाडेतत्त्वावर इमारतीत कार्यालय आहे. याच इमारतीत लोअर फ्लोवरला गोदाम आहे. जप्त केलेला माल ठेवण्यासाठी गोदाम आहे. जप्त केलेला माल गोदाम तसेच कार्यालयात ठेवला जात आहे. मात्र, जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने तीन ट्रक गुटखा पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आलेला आहे. इतर अन्नपदार्थांच्या बाबतीत कारवाई झाली तर संबंधित कंपनी किंवा दुकानातच माल जप्त करुन सील केला जातो. तसे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेतले जाते. परंतु, कायद्याने बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हा साठा ठेवण्यासाठी जागा तोकडी पडत आहे. शिवाय, या इमारतीचे भाडेही भरावे लागत आहे. दरम्यान, मागील सव्वा वर्षात अन्न प्रशासनाने ५९ तपासण्या करुन ३३ कारवाया करण्यात आल्या.
या कारवाईत ९३ लाख ६० हजार ५४० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यापैकी २४ लाखांचा गुटखा नष्ट करण्यात आला असून, ६९ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. २२ लाख, २३ लाख व २० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेल्या ट्रक पोलीस ठाण्यातच लावण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या २०२० मध्ये केलेल्या कारवाया
जानेवारी ०१
फेब्रुवारी ०४
मार्च ०३
एप्रिल ०२
मे ०४
जून ०६
जुलै ००
ऑगस्ट ००
सप्टेंबर ००
ऑक्टोबर ००
नाेव्हेंबर ००
डिसेंबर १२
जप्त साठा ठेवण्यासाठी जागा नाही
अन्न व औषध प्रशासन विभागाची इमारत भाडेतत्त्वावर इमारतीत आहे. या इमारतीत जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी गोदाम आहे. मात्र, या गोदामात जप्त केलेला माल ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे.
त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागास जप्त केलेला गुटखा कार्यालयात तसेच पोलीस ठाण्यात ठेवण्याची वेळ ओढवली आहे.
मागील सव्वा वर्षात ३३ कारवाया करण्यात
करुन ९३ लाख ६० हजार ५४० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यापैकी २४ लाखांचा गुटखा नष्ट केला २२ लाख, २३ लाख व २० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेल्या ट्रक पोलीस ठाण्यातच आहेत. तर केवळ ४ लाखांचा गुटखा गोदामात ठेवण्यात आलेला आहे.
कोट...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाया केल्या जात आहेत. मागील सव्वा वर्षात ३३ कारवाया केल्या असून, ९३ लाख ६० हजार रुपयांची सुगंधी सुपारी व गुटखा जप्त केला आहे. यातील २४ लाखांचा गुटखा नष्ट केला आहे.
-एस.बी. कोडगीरे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन