कोविड सेंटरमधील रुग्ण, नातेवाईकांना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:57+5:302021-05-15T04:30:57+5:30

सध्या कोरोनाने उमरगा - लोहारा तालुक्यात थैमान घातले असून, रुग्ण संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या रुग्णांना ...

Donation of food to patients, relatives at Kovid Center | कोविड सेंटरमधील रुग्ण, नातेवाईकांना अन्नदान

कोविड सेंटरमधील रुग्ण, नातेवाईकांना अन्नदान

googlenewsNext

सध्या कोरोनाने उमरगा - लोहारा तालुक्यात थैमान घातले असून, रुग्ण संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या रुग्णांना आधार देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोरोना रुग्णांसाठी मदत केंद्र सुरू केले. १ मेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व आयटीआय कॉलेज या दोन कोविड केअर सेंटरमधील रुग्ण व नातेवाईकांसाठी २२५ डबे दररोज मोफत अन्नदान केले जात आहे. यासाठी मुरूम बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते शरण पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, शहराध्यक्ष के. डी. पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, डॉ. बाळासाहेब भुजबळ, डॉ. शेख, विठ्ठल वचने - पाटील, दत्तात्रय गाडेकर, तानाजी माटे, उद्धव रणखांब, विजय सोनकटाळे, भालचंद्र लोखंडे आदींनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Donation of food to patients, relatives at Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.